Category: Poems

  • नीज

    विचारांनो चला येवो तुम्हाला नीज आताउठा भरपूर झाली ह्या मनाची झीज आता किती लावायचे वाटेस डोळे ह्या नभांच्यापडूद्या एकदाची ह्या मनावर वीज आता किती धुंडाळले मी अर्थ माझ्या जीवनाचेचला या होऊद्या आपल्या श्रमांचे चीज आता कितीदा आर्जवांचे दान मी मातीस केलेतरी उगवायची राहून गेले बीज आता देवेन पहिनकर

  • ज्योत

    ज्योत उजळदे लक्ख लक्खअन धगधते मनउगा कशाला संध्याकाळीतगमगते मनतिच्या स्वरांची शुभंकरोती कानी पडतापुन्हा कशाला संध्याकाळीबावरते मन देवेन पहिनकर

  • उन्हं

    पोळले मनास शब्द तापल्या उन्हातलेराहिले मनी दडून माझिया मनातले कितीक बांधली घरे सखे तुझ्या उन्हात मीघरास भेदू लागले तडे सुद्धा मनातले देवेन पहिनकर

  • दुपार

    माळावरच्या एखाद्या रखरखत्या दुपारी,बाभळी खालच्या बसस्टॉपवर मिणमिणत्या डोळ्यांनी…येणाऱ्या प्रत्येक बसकडे आशेनं बघणारं आयुष्य…रणरणत्या उन्हात तापलेलं, पायपिटीनी होरपळलेलंव्याकुळ होत दिसेल त्या बसमध्ये चढायला आतुरलेलं,तहानलेलं आयुष्य…अखेर बस येते आणि अडखळत का होईना आयुष्य चढतच…खिडकीशी बसतं, घाम पुसत सुटकेचा निश्वास टाकत…मागे सुटणाऱ्या, सोडून आलेल्या त्या उन्हाळ्यांचे,धगधगते हिशेब मांडायला डोळे मिटतंच, तेवढ्यात,टिंग टिंग… बसची…

  • इंटरनेट

    प्रिये तुझ्या हाताची बोटं सरसर फिरत असतीलत्या अगाध विश्वात…ठोठावत असतील माहितीची प्रत्येक कवाडंआणि डोकावून पाहत असतील अनेक खिडक्यांमधूनकुठे तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात का ते!पण तुझ्या प्रत्येक प्रश्नातून जन्म घेतो एक नवा प्रश्नअन तयार होतं एक मोठं प्रश्नचिह्न,मात्र तुझी बोटं थकत नाहीत..ती सरसर चालतात प्रश्नोत्तरांच्या नव्या शृंखला आखत…किती महाकाय जाळंय हे…

  • ध्यास

    काहूर वेदनांचे रात्रीच भोगलेलेआक्रंदत्या मनाने मी श्वास मोजलेले मज स्पर्शही न झाला गंधाळल्या फुलाचा मी फक्त पहिले मज अश्रूत नाहलेले लाटांसवे किनारी एकांत शोधला मी लाटेस जीवनाचे मी अर्थ अर्पिलेले -देवेन पहिनकर

  • Song of Love

    I was leaning on the usual grill having my tea at Bablu’s. After office hours I paid two visits to Bablu’s, one for my evening tea and the other for the delicious parathas. I was watching all the daily faces, tired badged professionals like me, who came to pick parcels…

  • यादोंके उजाले

    उन्हें बदलना था वो बदल गएहालात तो नहीं थें जो बत से बत्तर हो जाते लेकिन फिर भी संभल जातेवो लोग थे जो रौशनी की तलाश में चल पड़े थेऔर यहां तुम हो जो तिनकों से उजाले करने पे अड़े हो -देवेन पहिनकर

  • कविता सुचतात खऱ्या

    मला कविता सुचतात खऱ्यापण कवितांना मी रुचत नाहीमी असाच शब्दांशी खेळ करतोअंजारतो गोंजारतो अगदी ओरडतोहीपण सगळा कसा शब्द चिखलदलदली सारखा खोल खोल गेलेलामी शब्दागणिक इंच इंच खाली सरकत जातोअडकत जातो खोलवर दडलेल्या माझ्याच शब्दांच्या अर्थांमध्येअगदी तिथेच गुरफटून गेल्या सारखाएक केविलवाणा प्रयत्न म्हणून मी हातपाय मारतोपण फक्त ओरखडे ओढले जातात त्या…

  • ठरवून घे…

    तितकच बघ जितकं दाखवतायत तितकच खा जितकं चाखवतायत तुला खुप हौस असेलही पण त्याचा कोणाला त्रास नको कुठेही तुझा मुक्काम बेताचाच ठेवस्वतः खर्चिक राहा पण त्यांचे हिशेब ठेव तुला कसली हाव नसेलही पण त्यांना बोलायला वाव नको विचारतील तितकच बोलत जा नेतील तिथे निमूटपणे जात जा तुला खूप भटकायचं असेलही…